Fact Check: इथेनॉलमुळे अंडी महागली? कुक्कुटपालनासाठी मक्याचा तुटवडा?

Does ethanol production increase egg prices in India: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता इथेनॉलमुळे अंडी महागली असा दावा करण्यात आलाय...इथेनॉलसाठी मका लागत असल्याने याचा कुक्कुटपालनावर परिणाम होत असल्याचा दावा केलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
ETHANOL EFFECT ON EGG PRICES
ETHANOL EFFECT ON EGG PRICESsaam tv
Published On

इथेनॉलमुळे आता अंडी महागल्याचा दावा करण्यात आलाय...अंड्यांचा किरकोळ दर 8 ते 9 रुपये प्रति अंडे इतका आहे असा दावा करण्यात आलाय...हा दर इथेनॉलमुळेच वाढल्याचा दावा करण्यात आलाय...सध्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार केलं जातंय...E20 मुळे अनेकांच्या गाड्या खराब झाल्याचा आरोप करण्यात आला होता...आणि हेच इथेनॉल तयार करण्यासाठी मका आणि ऊसाचा वापर केला जातो...आणि मका हा कुक्कुटपालन उद्योगासाठीही वापरला जातो...त्यामुळे आता मका इथेनॉलसाठी वापरल्यामुळे कुक्कुटपालनासाठी कमी उपलब्ध होतोय आणि यामुळेच अंडी महागल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा वापर वाढल्यामुळे अंड्यांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यायत.हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे संभ्रम निर्माण झालंय...काहींनी सरकारविरोधात रोष व्यक्त केलाय...पण, खरंच अंडी महाग होण्याचं कारण इथेनॉल आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती सरकारकडून मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने याबाबत माहिती घेतली...मग काय सत्य समोर आलं पाहुयात...

इथेनॉल उत्पादनामुळे अंडी महागली नाही

मक्याचा तुटवड्यामुळे अंडी 40% महागली नाही

कुक्कुटपालन क्षेत्रासाठी पुरेसा मका उपलब्ध

कुक्कुटपालन क्षेत्रासाठी कच्च्या मालाचे संकट नाही

सध्या अंड्याचा दर हा 6 ते साडे 6 रुपये इतका आहे...

पशुसंवर्धन विभागाने या दाव्यांची चौकशी करून माहिती जारी केलीय...ऑगस्ट 2026 मधील सरासरी एक्स-फार्म दर प्रति अंडे 5 रुपये 50 पेक्षा कमी होता...जून आणि जुलै 2026 ची आकडेवारी पाहिली तर एक्स-फार्म दर प्रति अंडे 5 रुपये पेक्षा कमी राहिला...मार्केटमध्ये आपल्याला 6 ते 7 रुपयांना अंडं मिळतं...कुक्कुट पालनासाठी पुरेसा मकाही उपलब्ध आहे...पण, इथेनॉलमुळे अंड्यांची किंमत वाढल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com