Couple Fight : 'निघून जा, माझ्या आयुष्यात येऊ नको'; गर्लफ्रेंडची सटकली, मेट्रोमध्येच बॉयफ्रेंडला कानफटवलं, Video

Couple Fight in Delhi Metro : मेट्रोमध्ये एका जोडप्याची हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Couple Fight
Couple FightSaam tv

नवी दिल्ली : दिल्लीतील मेट्रोमध्ये होणारी हाणामारी,नाचगाणे , सीटवरून भांडण या सारख्या घटना सुरुच असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील या मेट्रोमध्ये किरकोळ गोष्टीवरून प्रवाशांमध्ये जोरदार भांडण होतात. काही दिवसांपूर्वी मेट्रोमधील जोडप्याचे अश्लील कृत्यही समोर आलं होतं. आता यामध्ये आणखी एका नव्या घटनेची भर पडली आहे. मेट्रोमध्ये एका जोडप्याची हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हिडिओमध्ये दिसून आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये एका जोडप्यामध्ये जोरदार भांडणे झाली. या तरुणीने तिच्या सोबत असलेल्या तरुणाला हातातील पिशवीने मारलं. त्यानंतर कानशिलातही लगावल्या.

तरुणी म्हणाली, 'सार्वजनिक ठिकाणी हात उचलू नको'. त्यानंतर दोघे पुढे चालू लागतात. त्यानंतर तरुण हा तरुणीला निघण्यास सांगतो. भडकलेली तरुणी पुन्हा या तरुणाला मारहाण करते. त्यानंतर तरुण देखील भडकतो. तरुणही प्रेयसीला कानशिलात लगावतो.

Couple Fight
Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

तरुणी म्हणते, 'मी मम्मीला सांगेल. तुझ्यासारखा मुलगा माझ्या आयुष्यात नको. निघून जा'. त्यानंतर तरुणी हाताने तरुणाला मारू लागते.

मेट्रोमध्ये एका प्रवाशाने या दोघांची भांडणे मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या दोघांचे भांडणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओ शेकडो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्स बोलत आहे की, दोघे भाऊ-बहिणी सारखे भांडत आहेत'. तर दुसरा एक कमेंट करत म्हणत आहे की, 'आता कोणी स्त्री-पुरुष समानता या विषयावर बोलणार नाहीत. एक तरुणी चक्क तरुणाच्या कानफटवत आहे'.

दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे, याबद्दल काही सांगता येणार नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये या आधी देखील अनेक हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन प्रवाशांमध्ये सीटवरून देखील अनेक भांडणे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही लोक या मेट्रोमध्ये डान्स देखील करतात. तर काही प्रवासी रील्स बनवताना दिसतात. यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Couple Fight
Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

डिस्क्लेमर : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या आधारावर हा आर्टिकल तयार करण्यात आला आहे. साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com