Delhi Reporter Viral Video: दिल्लीत भरपाण्यात उभं राहून महिला पत्रकाराची रिपोर्टिंग; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले, कारण...

Delhi Reporter Viral Video: भरपाण्यात दिल्लीत पूरपरिस्थितीचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओतील महिला पत्रकार नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल होत आहे.
Delhi Reporter Viral Video
Delhi Reporter Viral VideoSaam tv
Published On

Delhi viral Video: गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दिल्लीला झोडपून काढलं आहे. दिल्लीच्या काही भागात आता नदीचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, या भरपाण्यात दिल्लीत पूरपरिस्थितीचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओतील महिला पत्रकार नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल होत आहे. (Latest Marathi News)

दिल्लीतील (Delhi) महिला पत्रकाराचा गळ्यापर्यंत पाण्यात रिपोर्टिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिला पत्रकार (Journalist) दिल्लीतील पूरपरिस्थितीची माहिती देताना एनडीआरएफचे साहित्य वापरताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Delhi Reporter Viral Video
Horse and Ferrari Car Video: घोड्याचा राजेशाही थाट; चक्क महागड्या फरारी कारमध्ये दिलं जेवण, व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला पत्रकार पूरस्थितीचं वार्तांकन करण्यासाठी पाण्यात उतरली आहे. तिने पाण्यात शरीराभोवती सुरक्षा ट्यूब घालून पाण्यात वार्तांकन करताना दिसत आहे. तर एनडीआरएफचा एक जवान त्या पत्रकाराचे फोटो घेताना दिसत आहे.

मात्र, युजर रतन ढिल्लन यांनी ट्विटरवर या महिला पत्रकाराचा व्हिडिओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. रतन यांनी म्हटलं की, ही कोणत्या प्रकारचं बातम्याचं वार्तांकन आहे? पूरपरिस्थितीत एनडीआरएफ जवानाला लोकांची मदत करायला सांगितलं पाहिजे.

मात्र, मात्र एनडीआरएफचा जवान हा या महिला पत्रकाराचे फोटो काढताना व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या पूरग्रस्तांसाठी असलेल्या साहित्याचा वार्तांकन करण्यासाठी वापर केला जात आहे. आम्हाला अशा प्रकारचं वार्तांकन नको'.

दरम्यान, महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण रिपोर्टर आणि तिच्या वृत्तवाहिनीवर टीका करताना दिसत आहे.

Delhi Reporter Viral Video
Accident Viral Video: मंत्र्यांच्या ताफ्यातील भरधाव कार अ‍ॅम्ब्युलन्सला धडकली; रुग्णवाहिका जाग्यावर उलटली अन्... भीषण अपघात CCTVत कैद

दरम्यान, इतर काही युजरनेही या महिला पत्रकारावर टीका केली आहे. 'सरकारने या जोकरवर बंदी घातली पाहिजे', असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'एवढ्या पाण्यात उभी आहे, आता तिला पुढील काही दिवस भरपूर अँटि बायोटिक क्रिम लागेल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com