Accident Viral Video: मंत्र्यांच्या ताफ्यातील भरधाव कार अ‍ॅम्ब्युलन्सला धडकली; रुग्णवाहिका जाग्यावर उलटली अन्... भीषण अपघात CCTVत कैद

Ambulance Accident Viral Video: हा भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Ambulance Accident Viral Video
Ambulance Accident Viral VideoSaamtv
Published On

Viral Accident Video News: रस्त्यावर वाहनाने प्रवास करताना नेहमी रुग्णवाहिकेला प्राधान्य दिले जाते. कितीही रहदारी असली तरी रुग्णवाहिकेला तात्काळ वाट मोकळी करुन दिली जाते. इतकेच नव्हेतर रुग्णवाहिकेसाठी अनेकदा मंत्र्यांच्या गाडीचा ताफाही अडवला जातो.

मात्र सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या ताफ्यातील भरधाव गाडीने एक रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Viral Video News In Marathi)

Ambulance Accident Viral Video
Chandrayaan 3 Explainer: चांद्रयान ३ अवकाशात झेपावलं, आता पुढे काय, कसा असेल प्रवास? स्वप्नपूर्तीची मोहीम समजून घ्या १० पॉइंट्समध्ये

समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ केरळच्या (Keral) कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारकारा आहे. ज्यामध्ये शिक्षणमंत्री (Kerala Education Ministers) व्ही शिवनकुट्टी यांच्या गाड्यांचा ताफा निघाल्याचे दिसत आहे. या मंत्र्यांच्या ताफ्यासाठी काही काळ रस्त्यावरील गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.

मात्र यावेळी एक भरधाव रुग्णवाहिका (Ambulance) वेगाने जात होती. यावेळी मंत्र्यांच्या ताफ्यातील एका पोलिस व्हॅनने या रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिका जाग्यावर पलटी झाली. या भीषण अपघातानंतर सर्वांनी रुग्णवाहिकेकडे धाव घेत मदतीस सुरूवात केली.

Ambulance Accident Viral Video
Ajit Pawar News: अर्थ खात्याचा कारभार हाती येताच दुसऱ्या मिनिटाला अजित पवार लागले कामाला, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत आढावा

शिक्षण मंत्र्यांवर होतेय टीका...

ही पोलिस व्हॅन इतक्या वेगात होती की तिने समोर निघालेल्या एका दुचाकीलाही धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीस्वार पडता- पडता थोडक्यात बचावले. या अपघातानंतर मंत्रीमहोदय गाडीतून उतरून जखमींची विचारपुस करून पुढे रवाना झाले. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही होताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मंत्र्यांच्या व्हिआयपी मुव्हमेंटवरच टीका केली आहे. तर काही जणांनी पोलिस व्हॅन चालकाची चूक असल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com