

Summary -
दिल्लीतील नाईट क्लब बाहेरील एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
ही तरुणी पार्टीमध्ये इतकी दारू प्यायली की तिला चालता येत नव्हते
रॅपिडोच्या बाईकवर या तरुणीला बसता येत नव्हते
बाईक चालक या मुलीला सावरण्याचा प्रयत्न करत होता पण ती खाली पडत होती
या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही तरुणी नाईट पार्टीमधून घरी जात असते. तिने इतकी दारू प्यायली की तिला धड चालता येईना. तिने घरी जाण्यासाठी रॅपिडो बुक केली खरी पण तिला बाईकवर देखील बसता येईना. अशरक्ष: ही तरुणी बाईकवरून खाली पडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ दिल्लीतील आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या या तरुणीने इतकी दारू प्यायली आहे की तिला रॅपिडो बाईकवर धड बसता येईना. हा धक्कादायक व्हिडीओ दिल्लीतील एका नाईट क्लब बाहेरील आहे. ही तरुणी मित्रांसोबत या नाईट क्लबमध्ये पार्टीसाठी आली होती. पार्टी संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक करते पण तिला बाईकवर बसता येत नव्हते. ती सतत खाली पडत होती.
बाईक चालक या तरुणीला सतत पकडून सावरण्याचा प्रयत्न करतो जेणे करून ती रस्त्यावर पडून तिला लागू नये. पण ही तरुणी इतकी दारू प्यायली की तिला स्वत:ला सावरता देखील येत नाही आहे. तरुणीची ही अवस्था पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना देखील तिची ही अवस्था पाहून चांगले वाटत नव्हते. अशा अवस्थेत या तरुणीसोबत काही चुकीचे घडू शकते अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकरी जोरदार कमेंट्स करू लागले आहेत. अनेकांनी विनोदी कमेंट्स केल्यात तर काहींनी संताप व्यक्त केला. असा निष्काळजीपणा स्वत:साठी आणि इतरांसाठी धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काहींनी तरुणाईमध्ये आत्म-नियंत्रणाचा अभाव असल्याचे म्हटले आहे.
ही घटना फक्त एका मुलीची नाही तर संपूर्ण युवा पिढीचा बेजबाबदारपणा आहे, मजामस्तीच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहेत, काही माहिती आजकालच्या लोकांचे काय विचार आहेत, हे दिल्लीमध्ये सामान्य झाले आहे, नवीन पिढी माहिती नाही कुठे चालली आहे, आजकालच्या तरुण पिढीला हेच पाहिजे आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत नेटकरी राग व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.