Madhuri Elephant Video: वनतारामध्ये माधुरी हत्तीणीचा दिवस कसा जातो? व्हायरल व्हिडिओ पाहा

Daily Routine Of Madhuri Elephant In Vanatara : नांदणी गावची माधुरी हत्तीण आता वनतारामध्ये आनंदात आहे. सकाळी जंगल फिरणे, आंघोळ, औषधोपचार, दुपारची विश्रांती आणि पाण्यातील व्यायाम अशा दिनचर्येचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Madhuri Elephant Video
Madhuri Elephant Video
Published On

कोल्हापूरच्या नांदणी गावातील माधुरी हत्तीण ही सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. गेली ४० वर्षे माधुरी हत्ती नांदणी गावामध्ये वास्तव्यास होती. मात्र हल्लीच नांदणीतील माधुरी हत्तीणींला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले आहे. यामुळे नांदणीतील गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गावकऱ्यांनी रस्त्यावर मोर्चे काढत, आक्रोश करत माधुरी हत्तीणीला नेऊ नका अशी मागणी केली होती. तरीदेखील माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आले आहे.

Madhuri Elephant Video
Sick Cow Video Viral: हीच खरी माणुसकी! आजारी गायीला पाठीवर घेत दवाखाना गाठला, Video व्हायरल

सोशल मीडियावर माधुरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नांदणीतील गावकरी माधुरीवर मनापासून प्रेम करत होते. त्यांनी तिला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच सांभाळले होते. आता माधुरी हत्तीण आपल्यासोबत नसणार, यामुळे सर्वचजण दुखी झाले होते. माधुरी जाताना अनेकजण रडले. माधुरी वनतारामध्ये काय करते?, माधुरीचा सांभाळ कोण करणार? असे अनेक प्रश्न या गावकऱ्यांमध्ये होते. अशातच वनातारामध्ये माधुरीची दिनचर्या कशी आहे यासंबंधीतचा व्हिडीओ समोर आला आहे.

वनताराच्या अधिकृत इन्स्टापेजवर माधुरी हत्तीणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये माधुरीच्या संपूर्ण दिवसाची झलक दाखवण्यात आली आहे. माधुरी अत्यंत आनंदात तिचा दिवस घालवत आहे. माधुरी सकाळी सात वाजता उठते. त्यानंतर माधुरीला भाज्या आणि फळे असे आवडीचे पदार्थ खायला दिले जातात. साडेसात वाजता माधुरी जंगलात मनमोकळं फिरते. हिरव्यागार गवतामध्ये माधुरी मोठा फेरफटका मारते. साधारणपणे नऊ वाजता माधुरी विश्रांती घेते. साडेनऊ वाजता माधुरीला स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली जाते. माधुरीला हळूवारपणे अंजारले गोजारले जाते तिला मायेचा स्पर्श देतात.

पुढे, दहा वाजता पुन्हा माधुरीला खायला दिले जाते. यानंतर साडे अकरा वाजता माधुरीच्या जुन्या जखमांवर औषधोपचार केला जातो. एक वाजता माधुरी शांत विश्रांती घेते. दुपारची शांत विश्रांती आणि गवतासोबतचे तिचे खेळ पाहण्यासारखे आहेत. दोन वाजता माधुरीला आयुर्वेदिक उपचार देतात. यानंतर तीन वाजता माधुरीला हळूहळू चालवले जाते. चार वाजता माधुराली पाण्यातून व्यायाम दिला जातो यामुळे संधिवातासाठी आराम मिळतो. तिला विविध कौशल्य दिले जाते ज्यामध्ये पाण्यातून परत येणे. जंगलाच्या वाटेतून प्रवास करणे.

Madhuri Elephant Video
Landslide Viral Video: देव तारी कोण मारी! २ सेकंदामुळे वाचला जीव, धावत्या ट्रकसमोरच कोसळली दरड, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com