आई-बाबा आणि लेकीचा धमाकेदार डान्स, 'नवीन पोपट' गाण्यावर तुफान थिरकले; VIDEO

Family Dance Viral Video: नवीन पोपट हा या गाण्यावर कपल आणि त्यांच्या चिमुकलीचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यांचा सिंक्रोनाइज स्टेप्स आणि चिमुकलीचा गोडपणा पाहून तुम्हीही नक्कीच फॅन व्हाल.
Family Dance Viral Video
Couple and their little daughter groove to ‘Naveen Popat Ha’; their cute dance chemistry wins hearts on social mediaSaam Tv
Published On

Trending Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल आणि त्यांच्या गोंडस चिमुकलीने नवीन पोपट हा या मराठी गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. गाण्याचे ठसकेबाज बीट्स, कपलचा जबरदस्त एनर्जीने भरलेला डान्स आणि त्यांच्यासोबत लयीत ताल धरत नाचणारी चिमुकली या तिघांची धमाल केमिस्ट्री पाहून कोणीही भारावून जाईल.

हा डान्स व्हिडिओ(Video) इंस्टाग्रामवर एका रील स्वरूपात शेअर करण्यात आला असून अल्पावधीतच त्या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. फॉलोअर्सच्या लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. ''सुपर फैमिली" असे एका यूजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''बाबा आणि आईच्या तालावर नाचणारी परी", "इतकं क्युट कॉम्बिनेशन मी कधी पाहिलं नव्हतं" अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आलेल्या दिसून येत आहेत.

आजकाल सोशल मीडियावर अनेक डान्सचे विविध व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र, या व्हिडिओची खासियत म्हणजे त्यामधून दिसणारे नात्यांचे गोडवे. आई-वडील आणि त्यांच्या लहानग्या लेकीने एकत्र नृत्य सादर करणे ही एक भावनिक आणि सकारात्मक गोष्ट आहे. त्यांचा डान्स म्हणजे केवळ मनोरंजन नसून, कुटुंबात असलेल्या एकोप्याचे आणि आनंदाचे प्रतिक आहे.

या डान्स(Dance) मधील खरा स्टार म्हणजे ती चिमुकली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा निरागस उत्साह, आई-वडिलांच्या स्टेप्सची हुबेहुब नक्कल आणि मधूनच दिले जाणारे फनी एक्सप्रेशन्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. तिने घातलेला ड्रेस आणि चेहऱ्यावरचं निष्पाप हास्य हा डान्स अजूनच सुंदर बनवत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Family Dance Viral Video
Couple Dance Video: कमालच! दादा कोंडकेच्या गाण्यावर नवरा-बायकोचा डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com