Ghost Rumour Panic
Saam Tv

शाळेत भुत दिसल्याची अफवा; ५०० विद्यार्थी पळत सुटले;

Ghost Rumour Panic: चोपडा तालुक्यातील धानोरा आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीला भूत दिसल्याची अफवा पसरली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. पालकांनीही रात्रीच शाळेवर धाव घेतली.
Published on

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला अचानक भूत दिसल्याचा संशय आला आणि काही क्षणातच ही अफवा संपूर्ण शाळेत पसरली. त्यामुळे संपूर्ण आश्रमशाळेत भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या अफवेने इतकी गंभीर परिस्थिती निर्माण केली की तब्बल ४०० ते ५०० विद्यार्थी शाळा सोडून गेले. पालकांनीही घाईघाईने शाळेकडे धाव घेतली आणि आपल्या मुलांना घेऊन गावाकडे रवाना झाले.

विद्यार्थिनीला भोवळ, भीतीने पसरली अफवा

घटनेची सुरुवात एका विद्यार्थिनीला अचानक काहीतरी भयानक दृश्य दिसल्यामुळे झाली. तिने जोरजोरात किंचाळत घाबरणं सुरू केलं. काही क्षणातच तिला भोवळही आली. तिच्या प्रतिक्रियेने अन्य विद्यार्थीही घाबरले आणि भूत असल्याची चर्चा शाळेभर पसरली. कोणताही तर्कशुद्ध विचार न करता अनेक विद्यार्थी घाबरले, रडू लागले आणि ही अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. शाळेतील(School) वातावरणच एकदम भयभीत आणि अनिश्चित झालं

रात्रीच पालकांची शाळेवर धाव

ही घटना समजताच काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी फोन करून घडलेली गोष्ट पालकांना सांगितली. यानंतर पालकांनी रात्रीच शाळेकडे धाव घेतली. एकाच वेळी शेकडो पालक शाळेवर पोहोचले आणि आपल्या मुलांना तात्काळ घेऊन गावी निघून गेले. विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला, पण घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी ऐकून न घेता शाळा रिकामी केली.

मात्र या निमत्ताने आदिवासी(Tribal) विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधांचा अभाव देखील चव्हाट्यावर आला आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपयांचे वार्षिक अनुदान घेऊन मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र या आश्रम शाळांमध्ये दिसून येत आहे. त्याकडे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोयीस्कर कानाडोळा केल्याचे चित्र आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Ghost Rumour Panic
Pune Crime : पुण्यामध्ये तोडफोडीचं सत्र सुरु; मध्यरात्री टोळीने दहशत माजवली, २१ वाहनांच्या काचा फोडल्या; पाहा CCTV व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com