
Washil News: वाशिम शहराच्या व्यवहारे गल्लीत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास तलवारी, लोखंडी रॉड ,पाईप हातात घेऊन भर वस्तीत धुडगूस घालत आक्रमक होत दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न दोन्ही गटांनी केला आहे.
या घटनेमध्ये दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, रात्री साडेनऊच्या दरम्यान दोन्ही गट आमने-सामने आले आणि हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले दरम्यान या दोन्ही गटामध्ये नेमका काय आणि कश्यावरून वाद (Argument) निर्माण झाला हे मात्र,कळू शकले नाही. या घटनेमुळं या भागात नागरिक चांगलेच दहशतीमध्ये होते.परिसरात भीतीच वातावरण वातावरण पसरल होत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही गटांतील धुडगूस घालणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाशिम(Washim) शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात शुकशुकाट असून, पोलिसांनी गस्ती वाढवली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही गटांतील व्यक्तींना ओळखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या घटनेवर स्थानिक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या असून, शहरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असून, दोषींना तत्काळ अटक झालीच पाहिजे, असं अनेक नागरिकांनी म्हटलं आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.