
Marathi Wedding Video: लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचा मिलन नसून दोन कुटुंबांचं एकत्र येणं असंत. मात्र, गेल्या काही वर्षांत लग्नाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पारंपरिक विधींसोबतच आता लग्नात एंटरटेनमेंट, डान्स, रील्स, फोटोशूट आणि हटके एंट्री यांना तितकंच महत्त्व मिळालंय. असंच काहीसं एका नवविवाहित जोडप्याने करून दाखवलं आणि सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सध्या सोशल मीडियावर एका नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ(Video) वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या दोघांनी लग्नाच्या मांडवात चक्क डान्स केल्यामुळे पाहुणे थक्क झाले. पारंपरिक विवाह विधी सुरू होणारच होते. मात्र त्या आधीच दोघं डान्स करायला लागले आणि वातावरण पूर्णपणे जल्लोषमय झालं.
लग्नाचा कार्यक्रम सुरू होता, सगळे वऱ्हाडी आपापल्या जागेवर बसले होते. त्याच वेळी डीजेवर गाणं लागलं आणि नवरीने नवरदेवाचा हात धरत थेट मांडवात डान्स करायला सुरुवात केली. नवरदेवही मागे न राहता तिला साथ देतो. या दोघांचा ट्युनिंग, एनर्जी आणि स्मितहास्याने सगळे पाहुणे अक्षरशः फिदा झाले. काहीजणांनी टाळ्या वाजवल्या, काहींनी मोबाइलमध्ये तो क्षण कैद केला
हा डान्स(Dance) केवळ मांडवापुरताच मर्यादित राहिला नाही. पाहुण्यांपैकी कुणीतरी तो क्षण आपल्या मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आणि तो काही तासांतच प्रचंड व्हायरल झाला. 'मस्त जोडपं, ‘प्रेम आणि धमाल एकत्र पाहायची असेल तर हा व्हिडिओ बघा', 'साडीसोबत एवढा मस्त डान्स? काय बात आहे नवरीची' असे विविध कमेंट्स व्हायरल व्हिडिओवर उमटताना दिसतात.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.