अनेकांच्या आयुष्यात प्रेयसी असते. त्या प्रेयसीसोबत ते डेटवर जात असतात. पंरतु ज्या लोकांना प्रेयसी मिळत नाही ते ऑनलाइन पद्धतीने प्रेयसीच्या शोधात असतात. सध्या अशी अनेक अॅप निघाली आहेत, ज्याच्या मदतीने ज्याला प्रेयसी नाही त्याला प्रेयसी मिळते तर ज्या मुलीला प्रियकर नाही तिला प्रियकर मिळतो. (Latest News)
ऑनलाइन प्रेयसी मिळवण्याचं असेच एक अॅप आहे, ज्याचं नाव बम्बल आहे. परंतु या अॅपवर प्रेयसी मिळवणं एका मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील एका व्यक्तीनेही ऑनलाइन डेटिंग अॅपच्या माध्यमातून स्वत:साठी जोडीदार शोधण्याचा विचार केला. त्याला प्रेयसी मिळाली देखील. तो तिच्यासोबत डेटलादेखील गेला. परंतु त्याची ही पहिली डेट त्याला नेहमीच आठवेल. ज्या मुलीला सोबत पीडित मुलगा डेटवर गेला होता, त्या मुलीने त्याच्या हातात २२ हजाराचं बील देत गायब झाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाची बम्बल अॅपवर ३० सप्टेंबर रोजी एका मुलीसोबत ओळख झाली. त्या मुलीने त्याला एका रेस्ट्रो बारमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. परंतु माझ्याकडे कमी वेळ राहील आणि मला लगेच जावे लागेल. असं तिने त्याला सांगितलं होतं. त्यापद्धतीने या मुलाने रेस्ट्रो बारमधील एक टेबल बूक केला.
त्यानंतर बम्बल गर्ल आली येताच बरोबर तिने हुक्का आणि वाईन मागवला. ती ऑर्डरही लगेच आली. जास्त काही न बोलता ती मुलगी निघून गेली. त्यानंतर या मुलाला आलेलं बिल पाहून या मुलाला भर दिवसाचा चांदण्या दिसू लागल्या. पीडित मुलाकडे २ ऑक्टोबर रोजी रेस्ट्रोबारच २२ हजार रुपयांच बिल आलं.
हे बिल पाहून मुलाला डोक्याला हात मारावा लागला. दरम्यान त्या मुलीने त्याला बिल भरण्याचा आग्रह केला. तिने त्याला धमकी दिली होती, जर बिल भरलं नाही तर हॉटेलवाले तिची कार फोडून टाकतील. त्यांना तिच्या कारचा नंबर माहितीये. त्यावर ते घरी जातील आणि तिच्या घरच्याकडून अधिक पैसा वसूल करतील. शिवाय ते तिच्या डेटिंगविषयी ही सांगू टाकतील. त्यामुळे तू पैसे भर असं त्या मुलीने त्याला सांगितलं. नाईलाजाने त्याने ते बिल भरलं. पण बम्बल गर्ल मात्र त्या दिवसापासून गायब झाली.
पीडित मुलाने त्याच्या सोबत घडलेल्या प्रकाराविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. ती पोस्ट पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'मला वाटते की बार चालकानेच मुलीला कामावर ठेवले असेल. ही एक सामान्य रणनीती आहे. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी ते मुलींना कामावर ठेवतात आणि या गोष्टीकरून मुलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करतात.
या प्रकरणावर अजून एका नेट युजरने आपली प्रतिक्रिया दिलीय. 'मी अशा अनेक केसेस ऐकल्या आहेत. सत्य माहिती असूनही बम्बलवाले याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर पुणे पोलीसही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याविषयीची वृत्त इंडिया टीव्हीने दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.