Viral News: दुचाकीस्वार आणि बस चालकाचा भररस्त्यात राडा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video: भर रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Traffic Jam Viral Video:
Traffic Jam Viral Video:SAAM DIGITAL
Published On

Traffic Jam Viral Video

सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. हे व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पााडतात. अशातच आता भर रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागली आहे. या वाहनांच्या रांगेमध्ये बस देखील उभी राहिलेली दिसत आहे. तर रस्त्याची दुसरी बाजू मोकळी दिसत असून याठिकाणावरून वाहनं व्यवस्थित जात आहेत. अशातच याच बाजूने येणारा दुचाकीस्वार रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहतो. या वाहतूक कोंडीला बस चालक देखील जबाबदार असल्याचे पाहून हा तरूण संतापतो.

Traffic Jam Viral Video:
Young Man Beaten On Panhala Road | पन्हाळा मार्गावर तरुणाला मारहाण; फरार तरुणांचा शोध सुरु ;पाहा व्हिडिओ

तो रस्त्यामध्येच आपली दुचाकी उभी करून सुरूवातीला बस चालकाशी काही तरी बोलतो. अशामध्ये दोघांच्यामध्ये बाचाबाची होते. त्यानंतर हा तरूण दुचाकीवरून उतरून हेल्मेट काढून चालकाला शिवीगाळ करत बसमधून खाली उतरायला सांगतो. त्यानंतर तो बस चालकाला मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आणखी दोन तरुण त्याठिकाणी येतात आणि ते देखील बचचालकाला शिवीगाळ करत बसवर मारू लागतात. बसमधील सर्व प्रवासी हे भांडण पाहत असताना दिसत आहे.

शेवटी बसचालक वैतागून बसमधून खाली उरतो. पण तोपर्यंत हा तरुण दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळून जातो. तरूणाने भररस्त्यात केलेल्या या राड्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र व्हिडिओमध्ये दिसत आहे. बसमधील एका प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही तासांतच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओला @gharkekalesh या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ केरळमधील असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यात वाहतूक कोंडीदरम्यान अशाप्रकारची भांडणं आणि हाणमारी अनेकदा होत असतात. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण आतापर्यंत पाहिले आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हजारापेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअरही केला आहे. काही नेटकऱ्यांनी दुचाकीस्वाराला ट्रोल केले आहे. तर काहीनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे

Traffic Jam Viral Video:
Adil Rashid Run Out: असं कोण आउट होतं? फलंदाजीतील हलगर्जीपणा आदिल राशिदला महागात पडला; पाहा Run Out चा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com