Viral Dog Video: कुत्र्याला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा; हृदयस्पर्शी व्हिडीओने जिंकली लोकांची मन

Viral Auto Driver and Dog Video: हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Viral Dog Video
Viral Dog VideoSaam Tv
Published On: 

Viral Auto Driver and Dog Video: कुत्र्याला माणसाचा जवळचा मित्र म्हणतात. त्याला कारणंही तशीच आहेत. शेकडो वर्षांपासून कुत्रा हा माणसांचा सर्वात विश्वासू मित्र आहे. अनेक लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात. तो घरातील एक सदस्य असतो. त्याला माणसाप्रमाणेच प्रेम लागतं. त्याने आपल्यावर जीव लावला की तो शेवटपर्यंत त्या घरातील प्रत्येकाची काळजी घेतो. कुत्रे आपल्या मालकांसाठी काहीही करायला तयार असतात. (Latest Marathi News)

Viral Dog Video
Shirpur News: सावकारी जाचाला कंटाळला; स्‍टेटस्‌ ठेवत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सोशल मीडियावर (Social Media) देखील अनेकवेळी आपण कुत्र्यांचे असंख्य व्हिडीओ पहिले आहेत. हे व्हिडीओ पाहताना कधी कधी आपल्यला खूप हसू येत तर काही व्हिडीओ पाहून आपण भावूक होतो. सध्या असाच एक भावूक करणार हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक रिक्षा चालक कुत्र्याला आपल्या मांडीवर बसून ऑटो चालवताना दिसत आहे.

या व्हिडीओवर बंगळुरूमधील (Bengaluru) एक सर्वसामान्य दिवस असे लिहिलेले आहे. यावरुन हा व्हिडीओ बंगळुरूमधील आहे असा अंदाज लावला जात आहे. कुत्रा आणि ऑटोचालकाच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांचे मनं जिंकले आहे. रस्त्यावरुन जाणारे अनेक जण या ऑटो चालकाचे कौतुक करत आहेत. (Viral Video of Dog and Auto Driver)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक ऑटो चालक कुत्र्याला आपल्या मांडीवर बसून ऑटो चालवताना दिसत आहे. त्या कुत्र्यावर त्या चालकाचं किती प्रेम आहे हे त्याचा वागण्यातून दिसत आहे. तो एका रुमालाने कुत्र्याचा चेहरा पुसताना दिसत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या या ऑटोमधील हे दृश्यं एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ पाहून नेटकरी एकच वाक्य म्हणत आहेत, खरं प्रेम यांच्याकडून शिकलं पाहिजे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.