Viral Video: बैलपोळा उत्सवात बैल उधळला; शेतकऱ्यांची पळापळ अन् पुढे काय घडलं ते पाहाच

Bail Pola Festival Viral Video: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हतनूर येथे बैलपोळा सणात बैल उधळल्याने मोठा गोंधळ उडाला. दोन शेतकरी आणि एक बैल गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात बैलपोळा सणाच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. सायंकाळी बैलपोळा कार्यक्रमानिमित्त बैल अचानक उधळ्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. यावेळी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच घाबरले होते. बैलाने धुमाकूळ घातला होता यात दोन शेतकऱ्यांसह एक बैल देखील गंभीर जखमी झाला आहे. बैलासह दोन शेतकऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Viral Video
Viral Video: कंट्रोल सुटला, वाट मिळेल तिथं कंटेनर सुस्साट धावू लागला; महामार्गावरचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हतनुर येथे दरवर्षी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलपोळा सणानिमित्त गावातील सर्व शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून गावातील वेशीजवळ आणतात. याचदरम्यान काल बैल उधळल्याचा प्रकार झाला आहे. यावेळी वैभव कैलास कोतकर या शेतकऱ्याचा खिल्लार बैल अचानक उधळला. बैल उलटसुलट फिरू लागला. जोरात उड्या मारत गावाच्या वेशीत बैलासह उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाकडे शिरत अनेकांना मारत सुटला.

उधळलेल्या बैलाने जवळच असलेल्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारली. यावेळी भिंतीच्या कठड्यात बैलाचे मागचे पाय अडकले आणि तो बैल डोक्यावर पडला. त्यात बैलाचे समोरचे दोन्ही पाय मोडले असल्याची माहिती आहे. या घडलेल्या घटनेत समर्थ ज्ञानेश्वर म्हस्के (१२) ज्ञानेश्वर नामदेव झरेकर (३८) दोघे रा.हतनुर) हे दोघे शेतकरी देखील जखमी झाले आहे.

Viral Video
Viral Video: आधी एकमेकींना धडकल्या, नंतर भर रस्त्यात भोवऱ्यासारख्या गरागरा फिरल्या; दुचाकींच्या अपघाताचा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com