Viral Video: कंट्रोल सुटला, वाट मिळेल तिथं कंटेनर सुस्साट धावू लागला; महामार्गावरचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

मुंबई-नाशिक महामार्गावरील कंटेनरचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंटेनरचा वेग, ब्रेक फेलचा संशय आणि गोंधळामुळे वाहनचालकांमध्ये खळबळ माजली आहे.
Viral Video:
Viral Video: Saam Tv
Published On

सोशल मीडियावर वाहनाच्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा तरूण स्टंटबाजी करत वाहतुकीच्या नियमांचे देखील उल्लघंन करतात. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तसेच पोलिसांचा धाक न बाळगता हे तरूण स्टंटबाजी करतात याचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्याच असाच एक मुंबई- नाशिक महामार्गावरचा कंटेनरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video:
Viral Video: 'कधीच कोणाला कमी समजू नका' कुत्र्यानं चढवला बिबट्यावर हल्ला, २०० मीटर फरफटत नेलं अन्...

मुंबई - नाशिक महामार्गावरील कंटनेरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून कंटेनरची स्थिती अशी का झाली असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच कंटनेर चालकाची चालवण्याची स्टाईल पाहून अनेकजण गोंधळात पडले आहेत. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर बघ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई- नाशिक महामार्गावर एक कंटेनर वेगवान गतीने धावताना दिसत आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने कंटेनर धावत आहे. दरम्यान शहापूर तालुक्यातील वेहलोली फाट्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा ताबा सुटतो की काय असच हा व्हिडीओ पाहून वाटेल. कंटेनर हा दोन्ही बाजूला वळण घेत असताना कंटेनरची धडक होण्याची शक्यता दिसत आहे.

मुंबईकडे येण्याच्या आणि नाशिककडे जाण्याच्या या दोन्ही दिशेने हा कंटनेर धावताना दिसत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुढे हा कंटेनर 500 मीटर वर स्पीडमध्ये जाऊन डिवायडर पार करून रस्त्याच्या मध्येच थांबला आहे. महामार्गावरील कंटनेरचा थरारक दृश्य कार चालकाने त्याच्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंटेनरचा हा व्हिडीओ पाहून कंटेनरचा ब्रेक फेल झाला आहे की? तसेच कंटेनर चालकाचा तांबा सुटला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Viral Video:
Viral Video: आधी एकमेकींना धडकल्या, नंतर भर रस्त्यात भोवऱ्यासारख्या गरागरा फिरल्या; दुचाकींच्या अपघाताचा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com