Viral Video: तरुणीच्या जिद्दीला सलाम! नवीकोरी 'थार' घेतली अन् पाणीपुरीच्या गाडीला जुंपली|पाहा VIDEO

Tapasee Upadhyay Success Story: व्हिडिओमध्ये ती सांगते की पूर्वी "ती ही गाडी स्कूटरने ओढत असे. मग मी बुलेटने ओढायला सुरुवात केली आणि आज मी ते थारने ओढत आहे. हे एका रात्रीचे यश नाही त्यासाठी अनेक दिवसांची मेहनत असल्याचेही तिने सांगितले आहे.
Tapasee Upadhyay Success Story:
Tapasee Upadhyay Success Story:Saamtv
Published On

B Tech Paanipuriwali Viral Video:

अवघ्या २२ व्या वर्षी बी टेक पाणीपुरीवाली म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली तापसी उपाध्याय (Tapasee Upadhyay) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या तरुणीने नुकतीच महिंद्राची आलिशान थार गाडी खरेदी केली. विशेष म्हणजे ही गाडी चक्क तिने आपल्या पाणीपुरीच्या गाड्याला जुंपली, ज्याचा व्हिडिओ खुद्द आनंद महिंद्रा यांनी शेअर केला असून तिच्या या यशाचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे.

थार म्हणजे प्रत्येकाची ड्री कार... तरुणाईला महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडीचे विशेष आकर्षण आहे. गाडीचा आलिशान लूक आणि दमदार फिचर्समुळे प्रत्येकाला ही गाडी भुरळ घालत असते. आयुष्यात घेतली तर थारचं घ्यायची, असाही निश्चय काही जणांनी केला असेल. सध्या अशाच एका ध्येयवेड्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने आपल्या कष्टाने थार गाडी खरेदी करत थेट पाणीपुरीची गाडी ओढण्यासाठी जुंपली.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बीटेक पाणीपुरीवाली म्हणून प्रसिद्ध असलेली तरुणी थारमधून तिची पाणीपुरीची गाडी ओढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती सांगते की पूर्वी "ती ही गाडी स्कूटरने ओढत असे. मग मी बुलेटने ओढायला सुरुवात केली आणि आज मी ते थारने ओढत आहे. हे एका रात्रीचे यश नाही त्यासाठी अनेक दिवसांची मेहनत असल्याचेही तिने सांगितले आहे.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tapasee Upadhyay Success Story:
Odisha Accident Video: एक चूक अन् ७ जणांनी गमावला जीव! भरधाव स्कॉर्पिओच्या अपघाताची भयंकर दृष्य; VIDEO

हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या X (माजी ट्विटर) हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ते म्हणतात की 'ऑफ-रोड वाहने कशासाठी वापरली जातात? लोकांना अशा ठिकाणी जाण्यास मदत करा जिथे ते आधी जाऊ शकले नाहीत. आमच्या कारने लोकांना पुढे जाण्यास आणि त्यांची स्वप्ने जगण्यास मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Tapasee Upadhyay Success Story:
Nagpur News: नागपुरात लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com