Car Rally France: फ्रान्समध्ये श्रीरामाचा जयघोष! रामभक्तांनी काढली भव्य कार रॅली; VIDEO व्हायरल

Ram Mandir Inauguration: जगभरात आज राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष, उत्साह अन् आनंद पाहायला मिळतोय. ठिकठिकणी भव्य मिरवणूका सुरू आहेत. फ्रान्समधूनही रामभक्तांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
Ram Mandir Inauguration
Ram Mandir InaugurationSaamtv
Published On

Ram Mandir Utsav Rally France:

अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. फक्त भारतातच नव्हेतर जगभरात या खास सोहळ्याचे सेलिब्रेशन सुरू आहे. अशातच आता फ्रान्समधूनही रामभक्तांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

जगभरात आज राममंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळ्याचा जल्लोष, उत्साह अन् आनंद पाहायला मिळतोय. ठिकठिकणी भव्य मिरवणूका सुरू आहेत. प्रत्येकजण हा सोहळा आपापल्या परीने साजरा करत असून अवघा सर्वत्र भगवे वादळ आहे. सध्या सोशल मीडियावर फ्रान्समधील एका रॅलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, फुलांनी सजवलेल्या टेम्पोमध्ये उभे राहून सर्वजण श्रीरामाचा जयजयकार करीत आहेत. या भव्य रॅलीमधील प्रत्येक कारवर भगवा झेंडा पाहायला मिळत आहे. तसेच कडाक्याच्या थंडीतही लोक स्वेटर, कॅप घालून रॅलीचा आनंद घेत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ram Mandir Inauguration
Nanded News: 'मजबुरीने कोणी येत असेल तर स्वागत...' अशोक चव्हाणांच्या बॅनरवरुन प्रताप चिखलीकरांचा टोला

दरम्यान, फ्रान्ससोबतच जगभरातील देशांमध्ये राममंदिर उद्घाटनाचा सोहळा विविध उत्सव आयोजित करत साजरा करण्यात आला. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त अमेरिकेतील 1100 मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच टाइम्स स्क्वेअरसह मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले गेले. या सर्व सोहळ्यांचे असंख्य व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहेत. (Latest Marathi News)

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी गेल्यास काय मिळतील मोफत सुविधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com