Jaguar Viral Video
Jaguar Viral VideoSaamtv

Jaguar Viral Video: 'भगव्या जॅग्वार'चा थाट न्यारा! आलिशान गाडीवर साकारली अयोध्या नगरी; पाहा VIDEO

Jaguar Viral Video: गाडीवर संस्कृतमधील श्लोक, प्रभू श्रीरामांचे फोटो,मंदिराची प्रतिकृती आणि मनमोहक पणत्या असा खास साज दिला आहे. रस्त्यावर धावताना ही कार जणू भगवा रथच जात आहे की काय, असाच भास होतो.
Published on

Saffron Jaguar In Ayodhya:

देशभरात आज राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष, उत्साह अन् आनंद पाहायला मिळतोय. गावागावात, चौकाचौकात भव्य मिरवणूका सुरू आहेत. प्रत्येकजण हा सोहळा आपापल्या परीने साजरा करत असून अवघा देश भगवामय झाला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक खास व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भगव्या रंगाच्या आलिशान जॅग्वारने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. देशभरात जणू दिवाळीच साजरी होत असल्याचे वातावरण आहे. या खास प्रसंगी गुजरातमधील एका रामभक्ताने संपूर्ण अयोध्येची थीमच आपल्या कारवर साकारली आहे.

सिद्धार्थ दोशी असे या रामभक्ताचे नाव असून तो सुरतमधील प्रसिद्ध उद्योजक आहे. सिद्धार्थ दोशी याने आपल्या जग्वॉर कारला पिवळा आणि भगवा रंग दिला आहे. तसेच गाडीवर संस्कृतमधील श्लोक, प्रभू श्रीरामांचे फोटो,मंदिराची प्रतिकृती आणि मनमोहक पणत्या असा खास साज दिला आहे. रस्त्यावर धावताना ही कार जणू भगवा रथच जात आहे की काय, असाच भास होतो.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jaguar Viral Video
Jalgaon Accident : हनुमान दर्शनावरून परताना मोटारसायकलला अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

याबाबत बोलताना सिद्धार्थ दोशी म्हणाले की, 'हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे... आणि मला तो माझ्या श्रद्धेनुसार आणि इतरांना आनंद देत खास पद्धतीने साजरा करायचा होता. दरम्यान, या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येक जण त्याच्या या कारचे कौतुक करताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

Jaguar Viral Video
Kalyan News : वजीर सुळक्यावर श्रीरामांचा झेंडा रोवत श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराचे स्वागत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com