Holiday on 22 Jan Maharashtra : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी विद्यार्थ्यांना सुट्टी न दिल्याने भाजप कार्यकर्ते थेट शाळेत धडकले अन्...

Ram Mandir Inaguration : देशभरातील विविध शहरात आज धार्मिक कार्यक्रम आयाेजिले आहेत.
bjp karykarta condemns decision school for not giving hoilday on eve of ram mandir inaguration
bjp karykarta condemns decision school for not giving hoilday on eve of ram mandir inagurationsaam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News :

अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा साेहळा (ram mandir pran pratishtha) निमित्त आज (साेमवार) महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर (22 January 2024 holiday notification) करण्यात आली आहे. तरी देखील अमरावती येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना बाेलाविण्यात आले. हा प्रकार भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शाळेत धडक देत प्रशासनास जाब विचारला. (Maharashtra News)

अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने देशभर आनंदाचे वातावरण आहे. या आनंदात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी राज्य सरकारने देखील सर्व शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली.

bjp karykarta condemns decision school for not giving hoilday on eve of ram mandir inaguration
Ram Mandir Inauguration Live Telecast: महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दाखविला जाणार राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा: उदय सामंत

बडनेरा (badnera) येथील एका शाळेने मात्र विद्यार्थ्यांना सुट्टी न देता विद्यार्थी शाळेत बोलवले. ही बाब भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना समजताच त्यांनी शाळेत जाऊन शाळेच्या प्रशासनास व प्राचार्यांना चांगलेच फैलावर घेतले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी प्राचार्यांनी कुलकर्णी यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयाेग झाला नाही. अखेर शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थी घरी परतले. दरम्यान शाळेने सुटी न देण्याच्या या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

bjp karykarta condemns decision school for not giving hoilday on eve of ram mandir inaguration
Ram Mandir Nirman: रामाला अभिप्रेत असलेलं रामराज्य कुठे आहे? राेहित पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com