अभिजित देशमुख
कल्याण : कल्याण येथील गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक ऍडवेंचरने शहापूरजवळ असलेल्या वजीर सुळक्यावर भगवा रोवत श्रीराम मंदिराचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात (Kalyan) आले. इतिहासात पहिल्यांदाच वजीर सुळक्याच्या माथ्यावरून श्री रामांचा भगवा ध्वज लागल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (live Marathi News)
अयोध्या (Ayodhya) येथे प्रभू श्रीराम यांचे आगमन होत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याचे देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत व जल्लोष केला जात आहे. त्यानुसार गिर्यारोहकांनी अनोखे स्वागत केले. सदर विशेष मोहिमेत संघाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, सुहास जाधव, सुनील खनसे, अभिजीत कळंबे, स्वप्नील भोईर, प्रशील अंबाडे, राहुल घुगे यांनी सहभाग नोंदवला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
३०० फूट उंच चढत रोवला भगवा
वजीर सुळका म्हणजे ९० अंश कोनात उभा असलेला आणि सुमारे ३०० फूट उंच आहे. वांद्रे गावातून गिर्यारोहणाची सुरुवात करत सुमारे ३०० फूट उंच असलेला सुळक्याच्या पायथ्याशी श्रीरामांची विधिवत पूजा करत ह्या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.