शिरपूर (धुळे) : अन्न व औषध विभागाकडून आल्याची बतावणी करून किराणा दुकानदाराकडून गुटखा जप्त (Dhule) करत एक लाखांची खंडणी उकळली. खंडणी घेतल्यानंतर निघून गेल्यानंतर खऱ्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यामुळे आधीची कारवाई बनावट असल्याचे उघड झाले. दोन भामट्यांना थाळनेर पोलिसांनी (Police) अटक केली. (Breaking Marathi News)
तरडी (ता. शिरपूर) येथे सदरची घटना १९ जानेवारीला घडली. याबाबत सचिन सुभाष पाटील (वय २३, रा. तरडी) याने थाळनेर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांचे घरगुती स्वरूपाचे किराणा दुकान आहे. पहाटे सहाला त्यांच्या घराचे दार ठोठावून दोघांनी त्यांना उठविले. ‘आम्ही फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आहोत. (FDA) आमचे साहेब मागे येत आहेत. तुमच्याकडे गुटखा आहे का,’ असे विचारून त्यांनी घराची झडती घेतली. घरात ३० ते ३५ हजार रुपयांचा गुटखा सापडला. कारवाई टाळण्यासाठी संशयितांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पाटील यांनी तडजोडीपोटी एक लाख रुपये गोळा करून दिले. त्यानंतर संशयित पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघून गेले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही वेळाने धुळे येथील अन्न व औषध विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर, कांबळे यांनी पाटील यांच्या दुकानावर छापा टाकून गुटखा जप्त केला. त्यामुळे आपली फसवणूक करून एक लाखाची खंडणी घेतल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संशयावरून दोघांना अटक केली. संशयितांमध्ये राहुल शिवाजी देवकाते (वय ३५, रा. पंढरपूर, जि. सोलापूर), विनायक सुरेश चवरे (३५, रा. सोलापूर) यांचा समावेश असून, त्यांचा साथीदार लक्ष्मण ताडे फरारी आहे. संशयितांकडून कार पोलिसांनी जप्त केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.