अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम लल्लाच्या अभिषेकानंतर ५१ इंची मूर्तीची पहिली झलक अखेर जगासमोर आलीय. राम भक्त अयोध्या मंदिराच्या दर्शनाला जाण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्या मंदिरात दर्शनाला कसं जाता येईल, याचा प्लान करत आहेत. दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अनेक सुविधा देण्यात येत आहेत. अयोध्येतील रामलल्लाला भेट देण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या मोफत सुविधांबद्दल जाणून घेऊ.. (Latest News)
राम मंदिराला जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग
अयोध्येतील राम मंदिरात येऊन प्रभूचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही येथे दोन मुख्य मार्गाद्वारे येऊ शकतात. पहिला मार्ग भक्तीचा मार्ग आहे आणि दुसरा राम मार्ग आहे. भक्ती पथ मार्गावरून आल्यास तुम्हाला वाटेत हनुमान गढी, दशरथ महाल, राज द्वार मंदिर दिसेल. तर राम पथमार्गे आल्यास तुम्ही थेट राम मंदिरात पोहोचाल. यासाठी तुम्हाला फक्त राम पथ मार्गावरून फक्त ५०० मीटर चालावे लागले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दर्शन करणाऱ्यांना मिळतील या सुविधा
राम मंदिर (Ram Mandir) दर्शन करायला जाणाऱ्या भाविकांना राम मार्गावर एक रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याची माहिती सुविधा केंद्राच्या बाहेर दिसेल.
तुम्ही राम मंदिराच्या दर्शनाला जाणार असला तर तुम्हाला राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सुविधा केंद्र बाहेर राम पथ रस्त्यावर दिसेल. तेथे तुम्हाला मिळणाऱ्या मोफत सुविधांची माहिती मिळेल.
राम मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी रामपथ मार्गावर पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे.
दर्शन करायला जात असताना तुम्हाला तुमचा मोबाईल फोन बाहेर ठेवावा लागेल. यासाठी तुम्हाला फ्री लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.येथे तुम्ही इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवू शकतात.
याचबरोबर भाविकांना (Devotees) मोफत वॉशरूमची सुविधा आणि आराम करण्यासाठी टीन शेडची सुविधा तयार करण्यात आलीय. या शेडमध्ये तुम्ही आराम करू शकतात.
वयोवृद्ध व अपंग व्यक्ती दर्शनासाठी जात असतील आणि त्यांना चालता येत असेल तर त्यांच्यासाठी मोफत व्हीलचेअरची सुविधाही उपलब्ध आहे. तुम्ही व्हीलचेअर ड्रायव्हर ठेवल्यास तुम्हाला त्याची निश्चित फी भरावी लागेल.
यासोबतच राम पथ मार्गात प्रवेश करताच ट्रस्टच्या सुविधा केंद्राबाहेर मोफत होमिओपॅथी उपचाराची सुविधाही मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.