Viral Video: अरेरे! चालत्या बसच्या खिडकीत तरुणाचं डोकं अडकलं, काही केल्या निघेना; पुढे जे घडलं ते.. पाहा व्हायरल VIDEO

Andhra Pradesh Viral Bus Video: सुंदर राव नावाचा एक प्रवासी बसने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने थंड हवा खाण्यासाठी डोक खिडकीच्या बाहेर काढलं पण भलतचं घडलं. या सुंदर रावचे डोके त्या खिडकीत अडकून बसले.
Andhra Pradesh Viral Bus Video
Andhra Pradesh Viral Bus VideoSaamtv
Published On

Viral Video News:

प्रवास करताना चालू गाडीतून डोके बाहेर काढणे, हात बाहेर काढणे, उगाचच डोकावत राहणे, असे प्रकार अनेकजण करत असतात. मात्र अशा चुका अनेकदा धोकादायकही ठरतात. विशेषतः बस किंवा मोठ्या वाहनांमधून बाहेर डोकावणे फारच धोकादायक असते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video News in Marathi)

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) श्रीकाकुलममधील आहे. सुंदर राव नावाचा एक प्रवासी बसने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने थंड हवा खाण्यासाठी डोक खिडकीच्या बाहेर काढलं पण भलतचं घडलं. या सुंदर रावचे डोके त्या खिडकीत अडकून बसले.

तो अनेकदा प्रयत्न करतो मात्र डोकं काही खिडकीतून निघता निघत नाही. अखेर बस चालकाला बस थांबवून मोठ्या चलाखीने त्याचे अडकलेले डोके सोडवतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशी नसती उठाठेव केल्याबद्दल तरुणाला चांगलेच फटकारले आहे.

Andhra Pradesh Viral Bus Video
Prakash Ambedkar: 'शिंदेंना फायदा; भाजपचे नुकसान...' मराठा आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, सुंदर राव नावाच्या प्रवाशाचे डोके खिडकीत अडकल्याचे दिसत आहे. बस चालक बस थांबवून इतर प्रवाशांच्या मदतीने त्याचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र खिडकीच्या गजांमधील अंतर कमी असल्याने ते बाहेर निघत नाही.

शेवटी सर्वजण खिडकीच्या वरचा गज ताकद लावून खेचतात. ज्यामुळे खिडकीचा आकार मोठा होतो अन् सुंदरलालची सुटका होते. हा संपूर्ण प्रकार पाहून नेटकऱ्यांनीही सुंदर रावची चांगलीच हजेरी घेतली आहे. अशा बेशिस्त प्रवाशांमुळेच अपघात होतात, अशा टीका नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Latest Marathi News)

Andhra Pradesh Viral Bus Video
OBC Reservation: अध्यादेशावरून ओबीसी समाज सरकारवर नाराज? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com