देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी! अजितदादा परतणार? अजितदादांना पवारांनी लपवून ठेवलंय?

Fact Check: आम्ही व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळतो आणि सत्य सांगतो...अजितदादा परतणार असा दावा करण्यात आलाय...दादांना पवारांनी लपवल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय...या दाव्याची आम्ही पडताळणी केली...
Fact Check Report on Viral Claims About Ajit Pawar’s Return
Fact Check Report on Viral Claims About Ajit Pawar’s ReturnSaam Tv
Published On

...ऐकलंत, अजितदादांना लपवून ठेवलंय, दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आलाय...यासारखेच आणखीन काही व्हिडिओ व्हायरल होतायत...त्यातही काही दावे केले जातायत...

...या व्हिडिओत तर शिवराय आणि शंभू महाराजांचं उदाहरण देण्यात आलंय...त्यामुळे अनेकांना हा दावा खरा वाटू लागलाय...पण, व्हिडिओत म्हटल्याप्रमाणेच खरंच दादांना लपवून ठेवलंय का...? दादांचा अपघात झालेलाच नाही का..? असं असेल तर आनंदाचीच बातमी आहे...मात्र, याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या टीमने पंचनामा केलाय...

अजितदादांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केलाय...तर काहींनी दादांना प्लॅन करून मारल्याचा दावा केलाय...यामुळे दादांच्या मृत्यूवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातोय...दादांच्या निधनानंतर दादा जिवंतच आहेत असा दावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेयत...त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेऊन पडताळणी करणं गरजेचं आहे...आमच्या टीमने सर्व व्हिडिओ नीट तपासून पाहिले त्यावेळी काय सत्य समोर आलं

28 जानेवारीला दादांचा विमान अपघातात मृत्यू

अजितदादांना कुणीही लपवून ठेवलेलं नाही

व्ह्यूजसाठी सोशल मीडियावर रील्स बनवले जातायत

रिल्स पाहून विश्वास ठेवू नका...दादा जिवंत असावेत ही सगळ्यांचीच इच्छा आहे...तसं झालं तर चांगलंच आहे...मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवले जातायत...त्यांच्या दाव्यात तथ्य नाहीये...त्यामुळे अजितदादा परत येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com