Shifted  House Viral Video
Shifted House Viral VideoSaam Tv

Shifted House Viral Video: बाबो! ७ फुट उंच घर थेट खांद्यावर उचललं; तरुणांनी का केलं असं? कारण वाचून तुमचेही डोळे पाणवतील

7 Feet House Shifted On Shoulder: एका जागेवरुन दुसऱ्या जागी घर नेणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: आपण घर बांधतो, विकत घेतो परंतु तुम्ही कधी एका जागेवरुन दुसऱ्या जागी घर हलवताना पाहिलंय का? एका जागेवरुन दुसऱ्या जागी घर नेणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बांधलेलं घर एका जागेवरुन दुसरीकडे हलवता येत नाही. पण या घराला एक जागेवरुन दुसऱ्या जागी नेले आहे. काही लोक आपल्या खांद्यावर घर नेताना दिसत आहे. एवढं जड घर कसं काय कोणी नेऊ शकत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. पण हे घर सिमेंट, वाळू दगडाने बांधलेलं नसून ते लाकडाचं घर आहे. घर लाकडाचं असल्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे सोप्पे आहे.

Shifted  House Viral Video
MP Police Viral Video: तिरंगा यात्रेत पोलीस अधिकाऱ्याचा झकास डान्स, पाहा व्हिडीओ...

हा व्हिडिओ फिलिपाइन्स शहरातील आहे. या व्हिडिओत घर हलवण्याच्या मागेही एक कारण आहे. एका रिपोर्टनुसार, फिलीपिन्समधील झाम्बोआंगो डेल नॉर्टे येथे या घरात एक वृद्ध जोडप राहत होते. त्यांची पत्नी मरण पावली . त्यामुळे ते एकटे पडले. त्यांच्या घरातील इतर मंडळी म्हणजे मुलगा, नातवंड सर्व जण थोडे लांब राहत होते. वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्याला आपल्यासोबत राहण्यास सांगितले.

परंतु काही कारणास्तव त्यांना हे करता आले नाही. त्यांची वाईट परिस्थिती पाहून गावातील लोकांनी त्यांची मदत केली. जवळपास २४ लोकांनी मिळून हे घर आपल्या खांद्यावर उचलून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलंय. हे घर शिफ्ट करण्यासाठी जवळपास २ तास लागलेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी या सर्व लोकांचे कौतुक केले आहे.'अशी मदत करणारी लोकं क्वचितच भेटतात'. अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com