गच्चाळ जागा, तयार केलेल्या चिवड्याचा ढिग, अस्वच्छता तर बेक्कार...चिवडा पॅकिंग करणाऱ्या कामगाराचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. बाजारात पॅकिंग केलेला चिवडा चवीचवीनं खाल्ला जातो. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर चिवडा खाण्याचा विचार जरी मनात आला तरी किळस आल्याशिवाय राहणार नाही.
बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं किती घातक असतं हे वेळोवेळी आपल्याला सांगितलं जातं. तरीही हे खाद्यपदार्थ चवीचवीनं खाल्ले जातात. मग ते आरोग्याला किती अपायकारक आहेत हे माहीत असूनही फक्त टेस्ट म्हणून ते खाल्ले जातात. पण आरोग्याचा विचार केला जात नाही. एकवेळ हेल्दी खायला नको, पण असं चवीचं काहीतरी खायलाच हवं, असा काहींचा समज. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक कामगार चिवडा पॅक करतोय. पण ती गच्चाळ जागा, तिथेच चिवड्याचा ढिग आणि कामगाराचा अवतार बघितला तर चिवडाच काय, इतर बाहेरचे पदार्थ खाताना शंभर नाही तर हजारदा विचार कराल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चिवडा तयार केल्यापासून तो पॅकिंग करण्यापर्यंतचा घटनाक्रम आहे. ज्या ठिकाणी तयार केलेला चिवडा ठेवलाय, ती जागा कमालीची अस्वच्छ आहे. फरशीवरच चिवड्याचा ढिग आहे. त्यावरच बसून एक कामगार चिवडा पॅक करतोय. पायाखाली तुडवलेला, घाणेरड्या जागी साठवलेला चिवडा पाकीटात भरला जात आहे. तो कामगारही स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळताना दिसत नाही. तो स्वतःच घामाटलेला दिसतोय.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पाकीटबंद पदार्थ खरेदी करताना सावध राहावे, असा खबरदारीचा इशारा काही नेटकरी देत आहेत. आपण नक्की काय खातोय? असा प्रश्न उपस्थित करत अशा ठिकाणी तयार होणारे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काहींनी केली आहे. पाकीटबंद पदार्थ खाताना काळजी घ्यावी, बाहेरचे खाणे टाळावे असा सल्ला देखील काहींनी दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची पडताळणी केलेली नाही. हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत माहिती कळू शकलेली नाही.