Zeeshan Siddique: डी गँगची झिशान सिद्दिकींनी जीवे मारण्याची धमकी, प्रकरण काय? पाहा व्हिडिओ

After Baba Siddique’s killed, Son Zeeshan Receives Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांना 10 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशांत सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा सिद्दीकी यांना धमकी आल्यानं सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

झिशान सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली. त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना प्राप्त झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडे त्यांनी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. तसेच डि गँगचा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू असा उल्लेख मेल मध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com