बाप रे! आकाशातून थेट बुर्ज खलिफावर कोसळली वीज, व्हिडिओ पाहून बसेल धक्का; इमारतीचं नेमकं काय झालं?

Burj Khalifa Lightning : जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावर वीज कोसळल्याची घटना घडली..मुसळधार पावतास वीज कोसळली...यात इमारतीचं कोणतंही नुकसान झालं नाही.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी पावसात निसर्गाचा एक अद्भूत आणि तितकाच थरारक अनुभव पाहायला मिळाला. दुबईतील आणि जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'वर पावसादरम्यान वीज कोसळल्याची घटना घडली आहे. आकाशातून थेट इमारतीच्या शिखरावर वीज पडल्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जगातील सर्वात उंच वास्तू असल्याने बुर्ज खलिफावर वीज पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, इतकी भीषण वीज कोसळूनही इमारतीचे कोणतेही नुकसान झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या इमारतीमध्ये बसवण्यात आलेली अत्याधुनिक 'लाइटनिंग प्रोटेक्शन सिस्टम' (Lightning Protection System). ही यंत्रणा इमारतीवर पडणारी वीज शोषून घेते आणि ती सुरक्षितपणे जमिनीपर्यंत पोहोचवते. यामुळे इमारतीचा सांगाडा किंवा आतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांना कोणतीही इजा होत नाही.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इमारतीतील सर्व नागरिक आणि पर्यटक पूर्णपणे सुरक्षित आहेत. मुसळधार पावसातही या यंत्रणेने चोख काम केल्यामुळे एका मोठ्या संकटाचा धोका टळला आहे. या घटनेने पुन्हा एकदा मानवी तंत्रज्ञान आणि निसर्गाची शक्ती यांचा मिलाफ जगासमोर आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com