VIDEO: लोकसभेनंतर Khanapur मतदारसंघात विशाल पाटील पुन्हा ठाकरे गटाशी भिडणार?
लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट केलं आहे, सांगलीच्या खानापूर मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आटपाटी येथील सभेतून स्पष्ट केलं आहे. खानापूर विटा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला जाणार असल्याचं चित्र स्पष्टं आहे. शिवसेनेकडून तशी मागणी देखील करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे दिल्लीला असताना विशाल पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती, त्यामुळे या दोघांमधील तणाव निवळल्याची चर्चा होती परंतु त्यांनी पुन्हा मतदारसंघात येऊन आपण अपक्ष असून कोणाला घाबरत नाही, आणि आम्हाला बोलायचं कारण नाही अशा भाषेत विशाल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत वेगळी भुमिका स्पष्ट केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.