Hasan Mushrif On Ravindra Dhangekar |धंगेकरांनी 2 दिवसात माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानी दावा ठोकणार - हसन मुश्रीफ

पुण्यात डॉ. अजय तावरवेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठीशी घातले असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यावर मुश्रीफ यांनी धंगेकरांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

पुण्यात अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये डॉ. अजय तावरेने फेरफार केला होता. तावरेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठीशी घातले असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी धंगेकरांना माफी मागायला सांगितली आहे. तसेच धंगेकरांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असेही मुश्रीफ म्हणाले. भर चौकात फाशी द्याली असे कृत्य डॉ. अजय तावरेने केले आहे असे धंगेकर म्हणाले. पुणे हिट अँड रन प्रकरण चांगलेच तापले आहे. आज रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यलयात धडक दिली. आणि किती बेकायदेशी पब आणि बारवर कारवाई केली असा सवाल विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com