अमर घटारे, अमरावती | साम टीव्ही
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, कडूंना त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आपण कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
बच्चू कडू जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असून, त्यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे राहू, असे अमरावतीमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांसाठी काम केले आहे. सरकारमध्ये जाऊनही ते आधीसारखेच काम करतील, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना पक्ष विलीनीकरणाची अट घातली असेल असे वाटत नाही, असं काही कार्यकर्ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.