Bihar Election Results: बिहारमध्ये काँग्रेस भुईसपाट का झाली? ही चार कारणे|VIDEO

Four Major Factors Behind Congress: बिहार विधानसभेच्या निकालात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळत आहे. गोंधळ, मैत्रीपूर्ण लढती, लोजपच्या वेगळ्या लढतीमुळे झालेली मतविभागणी आणि सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर अपयश या चार प्रमुख कारणांमुळे हार झाल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसारच भाजप आणि जेडीयूच्या एनडीएला बहुमत स्पष्ट होत आहे. मात्र कॉँग्रेसचा अक्षरशः भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महागठबंधनसह कॉँग्रेसला नेमका फटका का बसला याचे कारण आता राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. जागावाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम राहिला हे एक मोठ कारण आहे. तर 11 जागांवर एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत झाली. तसेच लोजप एनडीएसोबत गेल्याने आरजेडीच्या मतांची विभागणी झाली. कुटुंबात एक सरकारी नोकरीचा मुद्दा पटवून देता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com