Raj Thackeray: शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू; राज ठाकरेंचे सरकारला आव्हान|VIDEO

Imposing Hindi Will Kill Marathi: राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार आता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल यावरून राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

तुम्ही आमच्या राज्यात तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आहेत. तुम्ही हे का लादत आहात या मागचे कारण काय? ही सक्ती आपण का लादून घ्यायची? हिंदी लादल्यास उद्या मराठी भाषा संपण्याची भीती आहे, असे राज ठाकरे म्हणाले, लेखक साहित्यिक कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला पाहिजे. मराठी संपवून टाकतील. हे शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावे. मोदी, आमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com