साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट! तहानलेल्या दुर्गम गावात पोहचले पाण्याचे टँकर, महिलांची पायपीट थांबली

Water tankers reach remote tribal village in Nandurbar : नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम पाड्यांवरील पाणीटंचाई आणि महिलांची हंडाभर पाण्यासाठी होणारी पायपीट याबाबतचे वृत्त साम टीव्हीनं प्रसारित केलं होतं. नंदुरबार जिल्हा प्रशासनानं तातडीने दखल घेतली असून, खडकापाणी गावात तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.

सागर निकवाडे, साम टीव्ही | नंदुरबार

दुर्गम भागातील गाव-पाड्यांवरील पाणीटंचाई आणि हंडाभर पाण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांची होणारी पायपीट पाचवीला पुजलेली. मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना एकदा मते मिळाली की त्याकडे बघायला वेळही नसतो. सरकार दरबारी तर आनंदी-आनंद! नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम पाड्यांवरील पाणीटंचाई आणि महिलांचे होणारे हाल साम टीव्हीने विशेष वृत्तामधून दाखवले होते. या बातमीनंतर नंदुरबार जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेतली. खडकापाणी गावात टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचले. काही काळापुरता का होईना महिलांची पायपीट थांबली. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला.

महिलांना सातपुड्याच्या दुर्गम भागात डोंगरदऱ्यांमधून पाण्याचे जड हंडे डोक्यावरून वाहून आणावे लागत आहेत. या महिलांना गर्भाशय खाली येणे आणि गर्भपातासारखे वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. साम टीव्हीच्या या विशेष बातमीनंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. गंभीर दखल घेत अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी गावात पाण्याचे टँकर पोहोचले. त्यामुळं महिलांना होणारा त्रास काही प्रमाणात का होईना कमी झाला आहे. केवळ टँकरवर न थांबता, कागदोपत्री अडकलेल्या कायमस्वरूपी पाणी योजनांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com