Virar News | विरारमध्ये दारूच्या नशेत महिलांचा राडा, शिवीगाळ करत पोलिसांनाच मारहाण

विरारमध्ये तीन तरुणींनी दारूच्या नशेत गोंधळ घातला आहे. या तरुणींनी पोलिसांनाही शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली आहे. विरारमधील एका बारमध्ये तीन तरुणींनी दारू प्यायली आणि गोंधळ घातला.

विरारमध्ये तीन तरुणींनी दारूच्या नशेत गोंधळ घातला आहे. या तरुणींनी पोलिसांनाही शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली आहे. विरारमधील एका बारमध्ये तीन तरुणींनी दारू प्यायली आणि गोंधळ घातला. काव्या या तरुणीने पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश पकडून कॉलर ओढली. महिला कर्मचाऱ्याने जेव्हा काव्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काव्याने या त्यांचा हात चावला. जेव्हा बारच्या महिला सुरक्षा मध्ये पडल्या तेव्हा त्यांचा टी शर्ट फाडला. या प्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिनही तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com