Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

Yogesh Kadam Replacing Rane In Sindhudurg Politics: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र ठेकेदारांच्या ताब्यात गेला असून शिंदे गटाला भाजप लवकरच दुय्यम ठरवेल, असा दावा त्यांनी केला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. लोकांच्या समस्या सोडविण्यामध्ये त्यांना फारसा काही रस दिसत नाही. मात्र, एकमेकांवर कुरघोडी करणे हे भाजप आणि शिंदे गटाकडून जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच एकाच कुटुंबाच्या हातात जिल्ह्याची सत्ता गेल्याने लुटारूंचा धंदा येथे सुरू झाला आहे.

योगेश कदम हे शिंदे गटाचेच मंत्री आहेत. महायुतीचे ते होऊ शकत नाहीत आणि भाजपवाले त्यांना मान्यच करीत नाहीत. या जिल्ह्यासह महाराष्ट्र या टवाळखोरांच्या- दलालांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भिकेकंगाल व्हायला लागला आहे. त्यामुळे योगेश कदम आले काय, नितेश राणे आले काय! येथील आढावा नितेश राणे यांनी घेतला पाहिजे. योगेश कदम यांना का यावे लागते? म्हणजे नितेश राणे कार्यक्षम नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. हे नितेश राणे यांचे फेल्युअर आहे हे योगेश कदम यांच्या दौऱ्याने सिद्ध झाले आहे.

खरी शिवसेना आमचीच आहे. गद्दार गटाला शिवसेना म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. भाजपची रणनीती पाहिली तर भाजप येत्या निवडणुका एकहाती लढेल आणि शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावतील. सध्या महाराष्ट्र हा लुटारूंच्या हातात गेला असून सध्या जनतेच्या पैशाची लूट करायची आणि आपल्या ठेकेदाराचे खिसे भरायचे ही नीती सध्या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. राज्याचे बजेट कोलमडलेले असताना सुद्धा शक्तिपीठ महामार्ग जो अदानीसाठी होत आहे. त्याला १ लाख कोटी पेक्षा खर्च होत आहे. मात्र, राज्यातील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. या सर्व विषयांवर आज विनायक राऊत यांनी संवाद साधत राज्य सरकार आणि योगेश कदम यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com