विद्यानंद बापट यांची दणदणीत मुलाखत, साम टीव्हीवरील EXCLUSIVE 'ब्लॅक अँड व्हाइट'मध्ये... सडेतोड प्रश्नांवर परखड उत्तरे | पाहा VIDEO

Vidyanand Bapat Statement On Mosque Loudspeakers: मशिदींवरील भोंगे, अजान आणि गणेशोत्सवातील डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर विद्यानंद बापट यांनी परखड भूमिका मांडली.

गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्याबाबत आता राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. तसेच त्यांच्यावर मुलाखतीदरम्यान एका इसमाने हल्ला देखील केला. या सगळ्या विषयांवर सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी साम टीव्हीवरील ब्लॅक अँड व्हाईट या विशेष कार्यक्रमात विद्यानंद बापट यांची मुलाखत घेतली. त्यात बापट यांनी परखड मते मांडली. दररोज सकाळी मशिदीवर भोंगे वाजतात, त्यासाठी विद्यानंद बापट रस्त्यावर का नाही उतरले? फक्त दहा दिवसांच्या गणपती उत्सवावर का बोलतात? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, एकाने गाय मारली या सबबीखाली दुसऱ्याने वासरू मारण्याच समर्थन करणे.

मशिदींवरील भोंगे हा मुद्दा चुकीचाच आहे. त्यावर बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय गेल्या वर्षी आलेला आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी देखील झाली. यावर मुंबई पोलिस आयुक्तांनी देखील सांगितले होते की, सगळे भोंगे उतरवले गेले आहे. आगामी गणपती उत्सवातच ध्वनिप्रदूषणावर पूर्णपणे बंदी घालावी अशी ठाम मागणी विद्यानंद बापट यांनी साम टीव्हीशी बोलताना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com