महायुतीचं ठरलं! विधान परिषदेसाठी असा ठरला अंतिम फॉर्म्युला; जाणून घ्या कोणत्या पक्षाला कोणती जागा?

Mahayuti seat sharing : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा अंतिम जागावाटप फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप ११, शिंदे सेना ४ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा देण्यात आल्या.

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपाच्या या सूत्रावर भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अखेर एकमत झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजप (BJP): ११ जागा

शिवसेना (शिंदे गट): ४ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): २ जागा

या जागावाटपात काही महत्त्वाच्या जागांवरून सुरू असलेला पेचही सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकची जागा शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचे ठरलेय. तर छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सोडण्यात आली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, या फॉर्म्युलामुळे महायुतीमधील धुसफूस थांबवण्यात नेत्यांना यश आल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com