पोलिसांकडूनच आंदोलक विद्यार्थ्यांवर दगडफेक; व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद, पाहा धक्कादायक दृश्य

Jantar Mantar protest : दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनादरम्यान समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांकडून आंदोलकांच्या दिशेने दगड फेकल्याचा दावा केला जात आहे.

Viral video of Jantar Mantar protest : नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप केला जात होता, मात्र आता या घटनेचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये पोलीस आणि सुरक्षारक्षक स्वतःच आंदोलक विद्यार्थ्यांच्या दिशेने दगड फेकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांचा बनाव उघडा पडला असून प्रशासनाच्या या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारानंतर आंदोलन अधिकच चिघळले असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com