VIDEO: Vasant More यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश, Uddhav Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यामधील मनसेचे माजी नेते वसंत मोरे अखेर मायदेशी परतलेले आहेत. मनसे सोडल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला होता. परंतु आता त्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत ठाकरे गटात प्रवेश केला. वसंत मोरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर पुणे हे सत्ताबदलाचं केंद्र व्हायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. वसंत मोरे यांनी आधी शिवसेना सोडली असल्यामुळे शिक्षा म्हणून पुण्यामध्ये पक्ष वाढवावा अशी कोपरखळी देखील उद्धव ठाकरे यांनी लगावली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.