Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या मित्रदेशाचा भारताला पाठिंबा; राजनाथ सिंह यांचा 'त्या' संरक्षण मंत्र्यांना फोन | VIDEO

Rajnath Singh Discusses with US Defense Secretary Pete Hegset: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली भूमिका मांडण्याचे प्रयत्न वेगाने सुरू केले आहेत.दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

भारताचा स्वर्ग म्हणून ओळख असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारत हा खवळला असून पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याही क्षणी भारत हा हल्ला करू शकतो. तर दुसरीकडे भारताने जागतिक स्तरावर आपली भूमिका सांगायला सुरुवात केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्याशी संवाद साधला. दोघांमध्ये पहलगाम हल्ल्यावर सविस्तर चर्चा झाली.

जाणून घ्या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली

राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.पीट हेगसेथ यांनी पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात मृत्यू जालेल्या लोकांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या. आणि भारत जी काय स्वतः च्या रक्षणासाठी भूमिका घेईल मला त्याचा पाठींबा असेल असा विश्वास अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंह यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com