Dharashiv Unseasonal Rain | धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान

धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण या पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धाराशिव: धाराशिवमध्ये (Dharashiv) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून (Heatwave) दिलासा मिळाला आहे. पण या पावसामुळे फळबागांचे (Fruit farming) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या (Tuljabhavani Temple) परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली आहे. या अवकाळी पावसामुळे नद्या नाले तुडुंब वाहत आहेत. फक्त धारशिवमध्येच नाही तर राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य नागरिकांची उकाड्याना लाही लाही होत आहे. पण अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण ग्रामीण भागात या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com