पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यातील तीनही दलाची तयारी पाहून पाकिस्तानची टरकली आहे. त्यामुळे पाकिस्तानने जगासमोर भीक मागायला सुरुवात केली आहे. इतर देशाकडे मदतीसाठी हात टेकताना दिसत आहे. या पहलगाम प्रकरणानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या मुद्यावर बैठक बोलवण्याची विनंती केली. मात्र या बैठकीत पाकिस्तानला तोंडावर आपटले.
संयुक्त राष्ट सुरक्षा परिषदेच्या बंद खोलीतील बैठकीनंतर पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार अहमद यांनी खोटे सांगत या बैठकीत आम्हाला जे पाहिजे ते मिळाले असा दावा केला. त्याशिवाय बैठकीत जम्मू काश्मीर मुद्यावरही चर्चा करण्यात आली असे म्हंटले. परंतु आता हळूहळू बैठकीतील मुद्दे समोर येऊ लागले आहे.
त्यामुळे पाकिस्तान हा तोंडावर पडला आहे. या बैठकीत पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यावरून रोखठोक प्रश्न विचारण्यात आले. पहलगाम हल्ल्यात लष्कर ए तोयबाच्या भूमिकेवरून पाकिस्तनला चांगलेच फटकारले आहे. UNSC च्या सदस्य देशांनी पाकिस्तानकडून भारताविरोधात होणाऱ्या खोट्या आरोपाना फेटाळण्यात आले. या बैठकीत पाकिस्तान स्वतःला पीडित म्हणून दाखवत भारतावर निशाणा साधत होता, मात्र हा डाव आता त्याच्यावरच उलटताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.