By-Election: मविआ की सुनेत्रा पवार? बारामती पोटनिवडणूकाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील: संजय राऊत

Baramati Bypoll Row: बारामती पोटनिवडणुकीचे वातावरण तापले असून, पाठिंब्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत.

बारामती पोटनिवडणुकीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्ली दौऱ्यावरून परतातच सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांचा पाठिंबा मागितला आहे. त्याबाबत खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यावर लवकर भूमिका स्पष्ट करतील. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार गटाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी पक्षप्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आहे. त्या संदर्भात काय निर्णय झाला त्याबाबत स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद संवाद साधतील. बारामती पोटनिवडणुकीबाबात काँग्रेसने चार ते पाच उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. उमेदवार ठरवण्याबाबत त्यांच्या पक्षात हालचाली सुरू आहेत.

याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील हे सुद्धा आपल्याला कळेल. अजित दादा पवार हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे जवळचे आणि निकटचे सहकारी होते, असं उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यावर आपल्याशी बोलतील. सुनेत्राताई पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही. तो पक्ष भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस वेगळा निर्णय घेणार असेल तर त्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लक्ष घातलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं भावनिक नातं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील हे स्वतः सांगतील असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com