Uddhav Thackeray: क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का?" उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल|VIDEO

Sindoor For People, But Blood With Cricket: उद्धव ठाकरे यांनी राज्य शिक्षण सेनेच्या कार्यक्रमात भाजपवर जोरदार हल्लाबोल करत गरम सिंदूरचा मुद्दा उपस्थित केला. जय शाह, पाकिस्तान क्रिकेट आणि माणुसकीच्या प्रश्नांवरून ठाकरे यांनी सरकारला सवाल केला.
Summary

उद्धव ठाकरे यांनी राज्य शिक्षण सेनेच्या कार्यक्रमात भाजपवर निशाणा साधला.

"गरम सिंदूर गेला कुठे?" असा सवाल करत माणुसकीबाबत सरकारला प्रश्न विचारले.

जय शाह यांच्यावर थेट टीका करत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात आवाज उठवला.

भाजपच्या भाकड कथांवर ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

राज्य शिक्षण सेनेच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कबूतरांसाठी लोक रस्त्यावर उतरतात, कुत्रे आणि हत्तीसाठी उतरतात ही चांगली गोष्ट आहे. पण पहलगामवेळी माणुसकी कुठे जाते? गरम सिंदूर वाहत असल्याचे बोलतात आणि देशाची टीम पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार, जय शाह तुमचा कोण लागून गेला? आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तुम्ही घराघरात जाऊन सिंदूर वाटणार होते. आता तो गरम सिंदूर गेला कुठे? कशाला या भाकड कथा करता तुम्ही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com