Udayanraje Bhosale Satara: काल डिपॉझिट भरलं आणि आज उमेदवारी जाहीर! उदयराजेंना भाजपकडून पुन्हा संधी

Satara Lok Sabha Election 2024: उदयनराजे भोसले यांनी आपलं उमेदवारीसाठीचं डिपॉझिटही कालच भरलं होतं. उमेदवारी जाहीर होण्याआधी उदयनराजेंनी डिपॉझिट भरल्यानं चर्चांना उधाण आलं होतं.

सातारा : उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आहे. भाजपकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बाराव्या यादीत उदयनराजे भोसले यांचं नावही साताऱ्याचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. साताऱ्यात महायुतीकडून आता उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, कालच शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उदयनराजे भोसले यांनी आपलं उमेदवारीसाठीचं डिपॉझिटही कालच भरलं होतं. उमेदवारी जाहीर होण्याआधी उदयनराजेंनी डिपॉझिट भरल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. अखेर भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्तामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळे साताऱ्यात कुणाविरुद्ध कोण लढणार, हेही स्पष्ट झालंय. उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून उदयनराजेंनी प्रचाराही आणि लोकांच्या गाठीभेटी घेण्यासही सुरुवात केली होती. अखेर त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न भाजपने जाहीर केलेल्या नव्या यादीतून निकाली काढण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com