समृद्धी महामार्गावर नियम धाब्यावर, दुचाकीवर तरुणाचा बिनधास्त प्रवास, व्हिडिओ समोर

Samruddhi Expressway bike incident in Chhatrapati Sambhajinagar समृद्धी महामार्गावर केवळ चार चाकी वाहनांना परवानगी आहे. पण संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर एका युवकाने बाईकवरून प्रवास केल्याचे दिसून आले.

Why are two-wheelers banned on Samruddhi Expressway? समृद्धी महामार्गावर केवळ चार चाकी वाहनांना परवानगी आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दुचाकी दिसली... समृद्धी महामार्गावर अनेकवेळा दुचाकीस्वार प्रवास करत असल्याने मोठ्या वाहनांकडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जातेय... टोलनाक्यावर दुचाकीस्वारांना अडवलं कसं जात नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय...

समृद्धी महामार्गावर फक्त चार चाकी वाहनांना परवानगी आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर चक्क टू व्हीलर वर बिनधास्तपणे एक युवक दिसला. समृद्धी महामार्ग अनेकदा असे प्रसंग घडत असल्याचं बोलले जातंय. असे बिनधास्तपणे टू व्हीलर जात असल्यामुळे वेगाने जाणाऱ्या मोठ्या वाहनांकडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे समृद्धी महामार्वर कोण कोणती गाडी घेऊन येते, कोण प्रवास करतो हे कुणाच्या लक्षात येत नाही का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण समृद्धी महामार्गावर प्रवेश करायचा असेल तर टोलनाक्यावरून समृद्धीवर जावं लागतं. मग टोलनाक्यावर टू व्हीलर धारकांना अडवत का नाहीत असाही प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com