VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी वैतागले

Traffic Jam On Mumba-Pune Express Way: मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईवरून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये राहणारे चाकारमानी गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईवरून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. लहान मुलं, वयोवृद्ध, महिला यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे.

गणेशोत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी चालले आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी गाव असणारे आणि कामानिमित्त मुंबईमध्ये राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वाहतुक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. बोरघाट पोलिस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेनवरून वाहतूक सुरळित करण्याचा आणि ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com