अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमारनेही सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय कुमारच्या घरावर बुलेटप्रूफ काचा बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या निशाण्यावर अक्षय कुमारही असल्याची चर्चा असून, आरोपींनी त्याच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. दरम्यान, अभिनेता सलमान खानच्या घराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येत आहे. सलमान खानच्या घरावर यापूर्वीच बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या होत्या. आता या काचा अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अपग्रेड केल्या जात असल्याची माहिती आहे. अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनांमुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या प्रकरणातील माहितीची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.