MIM चा मविआला २८ जागांसाठीचा प्रस्ताव, कोणते मतदारसंघ मागितले?
Maharashtra Politics : मागील दोन महिन्यांपासून MIM पक्ष हा महाविकास आघाडीबरोबर येण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. आता एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीकडे 28 जागांसाठीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. यापूर्वीही त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची माझी भेट झाली असा दावा केला होता. मात्र त्यावर मविआतील कुठल्याच नेत्यानं उत्तर दिलं नव्हतं.
राज्यातील 28 विधानसभा मतदारसंघासाठीचा प्रस्ताव MIM ने महाविकास आघाडीकडे दिल्याचे सांगितलं जात आहे. जिथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे अशा 28 जागांवर एमआयएमच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे लेखी पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सर्वाधिक जागा या मुंबई ठाणे मधील आहेत. मुंबादेवी, धारावी, भायखळा, कलीना, चांदिवली, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मानखुर्द, अणुशक्ती नगर, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, भिवंडी पश्चिम आणि पूर्व, मुब्रा कळवा, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, नांदेड उत्तर, नांदेड मध्य, पुणे कॅन्टोन्मेंट, सोलापूर मध्य, अमरावती, अकोला पश्चिम, वाशिम, अकोट, बाळापूर, मालेगाव, धुळे शहर या जागांचा प्रस्ताव दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.